Whatsappstatus.life provides all types of WhatsApp Status, Shayari, Kavita, Lyrics, Poem, Quotes, Wishes, love status, 2 line status, punjabi sad status, shayari and jokes, love quotes in punjabi, fb status, realistic quotes on life in hindi, life quotes in hindi, life status, life quotes in hindi, english qoutes, diwali hindi wishes, emotional life quotes, girlish attitude quotes, quotes in hindi funny, funny quotes in hindi, savage karma quotes, cute girl pic, love status, 2 line status,punjabi status, punjabi sad status, sad status for punjabi,fadu status, shayari and jokes, love quotes in punjabi, fb status, attitude king quotes,attitude powerful lion quotes,lion motivational quotes, realistic quotes on life in hindi,life quotes in hindi, life status,love thoughts in marathi, happy anniversary in hindi,life quotes in hindi, good morning beautiful quotes,english qoutes,diwali hindi wishes, emotional life quotes,girlish attitude quotes,girls attitude status, quotes for girls attitude, attitude quotes for girls,quotes in hindi funny,hindi quotes funny,funny quotes in hindi,savage karma quotes,
मी तिला रोज पाहायचो पापण्यांच्या आड तिला दडवायचो रोज सकाळी बस स्टॉप वर तिची वाट पाहायचो तिची बस येता ती हळूच खिडकीतून मान काढायची तिला पाहून मी मात्र खुश होयचो तिची बस पुढे जाता मी clg साठी निघायचो बस ला cut मारून तिच्या आधी clg ला जायचो Clg गेट ला उभा राहून तिला बस मधून उतरताना पाहायचो ती class मध्ये जाता मी पण class मध्ये आरामात जायचो शेवट बाकावर बसून तिलाच पाहायचो ती समोर असता नजर हटत नाही,तिची नजर वळता बेभान मन आवरतो तिच्या चेहऱ्यावर उमटलेले स्मित,हळुच मनाच्या तिजोरीत साठवतो तिच्या मुळे माझी मात्र हजेरी 100% लागत होती Clg life तर आपली भारी होती अशी माझी एक तर्फी प्रेम कहाणी होती
आल्या पासून पाहत होतो, ती नजरेत काहीतरी शोधत होती, मी नजर चुकवली खरी, पण ती मात्र स्तब्ध होती, मी चोरटा कटाक्ष टाकला, अन वाटलं, तिला काहीतरी विचारायचय, मी आधीच निरुत्तर, म्हणालो, मला थोडं लवकरच निघायचंय, न राहवून तिने विचारलंच, मी तुला खरच आवडते ना? प्रश्न साधाच, पण मनाची धडधड थांबेना, काय बोलू अन कसं बोलू, खरंच काही सुचेना, तिला उमगलं, माझ्या अनुत्तरित प्रश्नावर तिने ठेवलं बोट, क्षणाचाही विलंब न करता, जवळ ओढून तिच्या ओठांवर ठेवलं ओठ.. ती बेचैन झाली, पण तिचा सोडवायचा प्रयत्न असफल गेला, मी मात्र मिठीत घेत, उरल्या प्रश्नांचा सांगोता केला...
नको सोने, नको हिरे, नको मोगऱ्याचा वास मला हवा फक्त आणि फक्त तुझा सहवास नको काश्मीर, नको केरळ, नाही फिरण्याचा ध्यास मला हवा फक्त तुझा सहवास नको गाडी, नको बंगला, नाही कशाचा हव्यास मला हवा फक्त तुझा सहवास नको स्तुती, नको शाब्बासकी, नाही कशाची आस मला हवा फक्त तुझा सहवास तू माझा, मी तुझी हाच माझा आभास मला हवा फक्त तुझा सहवास
मी त्या बेवड्या सारखा आहे जसा तो त्या दारुच्या बोटल वर प्रेम करतो तसं मी फक्त तुझ्यावर प्रेम करतो मी त्या बेवड्या सारखा आहे त्याला माहीती आहे की दारू पिल्याणे त्याचं लिवर कमजोर होईल तरीही तो ती बोटल ह्रदयाला लावुन बसतो तसं मला माहिती आहे तूला आठवल्या नंतर खूप त्रास होतो तरीही मी सारखं सारखं तुझ्या आठवणीत बसतो मी त्या बेवड्या सारखा आहे त्या दारूच्या बोटल वर लिहिले असतं (दारू स्वस्थासाठी हानिकारक आहे) तरीही तो त्यातले दोन थेंब हि न सोडता पुर्ण बोटल प्रेमाने पिउन टाकतो तसं मला माहिती आहे तु मला आपलं कधी नाही समजणार तरीही मी घरच्यां पेक्षा जास्त तुझ्यावर जीवापाड प्रेम करतो मी त्या बेवड्या सारखा आहे शेवटी मरताना ही तो दारू चांगली होती साला लिवर कमजोर निघालं असं बोलत बसतो तसं मला माहिती आहे मी कुठे तरी तुझ्या नजरेत कमी आहे तरीही मी नशीबाला दोष देत बसतो
कस सांगू तुला माझ्यासाठी काय आहेस तू.... माझा जीव माझा प्राण तू... माझे जग माझं विश्व तू.... माझा श्वास माझा ध्यास तू.... माझ्या साता जन्माची आसं तू... कस सांगू तुला माझ्यासाठी काय आहेस तू.... माझा दिवस माझी रात्र तू... माझा प्रकाश माझा अंधार तू... माझं ध्येय्य माझी वाट तू... देवाने बांधलेली नशिबाची गाठ तू.... कस सांगू तुला माझ्यासाठी काय आहेस तू....
झालेत बरेच दिवस ओढ तुझी लागली, का कळेना मला आता तू सर्वत्र भासू लागली... तुझा विचार करता मनी चाहूल तुझी लागली, नकळत आले हसू गाली प्रीत तुझी बहरली...😘नको छळुस वेडे आता भेट पावलो पावली, तुझ्या भेटीची उत्कंठता आता हृदयी दाटली...😔 होशील तू माझी फक्त तू माझ्यातच रमली, पाहुनी माझ्या डोळ्यात बघ तुझी कळी कशी खुलली 😘🥰
आज अचानक दिवसांतून एवढ्या... वेळ मिळाला फावला... अनेक दिवसातून मिळाली सोबत... त्यात प्रेमाला तुझ्या मी हावरा.... आज कुठे तरी फिरायला जावू.... मधे मधे कोणाचा व्यत्यय नको ... शांत बसाव कुठे तरी हात तुझा हाती घेवून... कुरवाळत बसाव काळे भोर सुंदर केस तुझे... मधेच कोणाची अडचण नको.... डोक्याला टेकन तुझ्या मांडी चे असावे.... सोबत बडबड तुझी कानी असावी... क्षण हे साजरे टळू नये... मन भेरेपर्यंत हलू नये..... परत येताना कोठे तरी पाणी पुरी तुझ्या आवडीची खावू.... क्षण हे सोबत घालवताना डोक्याला दुनियेचा त्राण नको... क्षण हे आनंदाचे प्रेमाचे... रोज रोज आता घडून येत नाहीत... वेळ असा फावला नशिबी वरचे वर येत नाही.... खंत माझ्या मनी आहे वेळ तुला देता येत नाही ... प्रेम तुझ्यावर असिमित आहे... पण सारखं शब्दात सांगणे मला जमत नाही.....
तुला नको असला तरी मला शेवटचं भेटायचं आहे तू कधीच न दिसण्याच्या आधी डोळे भरून पहायचा आहे ठरवलं आहे दोघांनीही कि भेटल्यावर डोळ्यांत आणायचं नाही पाणी पण माहिती आहे भेटल्यावर अश्रुन्शिवाय बोलणार नाही कुणी खूप काही बोलायचा आहे खूप काही सांगायचं आहे मनात साठवलेल्या शब्दांना ओठावर आणायचं आहे तुझा शेवटचा चित्र मनात रंगवायचा आहे हा चेहरा परत दिसणार नाही म्हणून मनाला समजवायचा आहे जाता जाता फक्त माझी एवढीच अपेक्षा आहे एकदा मिठीत घेऊन तुला अश्रूंमध्ये चिंब भिजायचा आहे.
असावा चंद्र सोबतीला, काळोखात ही तुझी प्रतिमा दिसावी, दरवळणार्या रात राणीला तुझ्या येण्याची चाहूल असावी... शोधत असेल तुला,मी तुझ्याच अवती-भवती, "एका नजरेत तुझ्या माझे नैराश्य संपून जाईल, नव्याने पेटून उठेल मी माझ्याच चिते वरती... काळोखातील त्या सर्व चांदण्यात तू सर्वात शुभ्र हवी, क्षणांची ही रात्र चालेल पण तुझी एक भेट हवी...
ऑनलाईन ऑफलाईन न आणि फ मधलं अंतर निघून जाण्यासाठी असतं या सीस्टीमचं अस्तित्व फक्त मोबाईल पुरतं असतं कीतीही ऑनलाईन ऑफलाईन केलं तरी -हदयाचं ऑनलाईन नेहमीच चालू असतं ऑनलाईन ला ऑनलाईन ऑफलाईन ला ऑफलाईन -हदयचं उत्तर देत असतं
तुझ्या मनातला शब्द मि ओळखावा... तुझ्या मनातला शब्द मि ओळखावा... तुझ्या हसण्याचा मला आनंद मिळावा... प्रत्येक वेळी तुझ्या विषयात माझा लेख असावा... तुझ्या सारखा जीवलग सात जन्मी मला मिळावा... माझ्या दु:खात मला तुझा हसरा चेहरा दिसावा... माझ्या सिक्रेट गोष्टींचा पासवर्ड तुझ्या कडे असावा... चंद्रा प्रमाणे तुझा गारवा माझ्यात असावा... तुझ्या सारखा जीवलग सात जन्मी मला मिळावा..
माझ्या जीवाची जिवलग आहेस तु... माझ्यासाठी खूप अलग आहेस तु ...स्वप्न नसुन वास्तव आहेस तु ... काळजात धग धगणारा विस्तव आहेस तु ... मनाची ना थांबणारी घालमेल आहेस तु ... या आयुष्याचा जणू ताळमेळ आहेस तु ... हवेत अलगद झुलणारा झोका आहेस तु ... या हृदयाचा ना चुकणारा ठोका आहेस तु ... न संपणारा एक प्रवास आहेस तु ... माझी आस ... माझ्या श्वास आहेस तु ...
तुझ्यावर खूप प्रेम करायचंय मला, तुझ्या प्रत्येक शब्दांचा आवाज व्हायचंय मलातुझ्या हसण्याचं कारण बनायचं आहे मला, तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं निरसन करायचंय मला,तुझ्या एकटेपणात सहभागी व्हायचंय मला, तुझ्या अडचणीत साथ द्यायची आहे मला, तुझ्या या निरागस मनात छोटीशी जागा बनवायची आहे मला, तुझ्या डोळ्यात बेधुंद होऊन, तुझ्या जगात जगायचंय मला, तुझ्या मिठीत पूर्ण आयुष्य अधिकाधिक सुंदर करायचंय मला, खरंच तुझ्यावर खूप प्रेम करायचंय मला.......
एकदा घरटं सोडलेली पाखरं, परततांना पाहिलीत का ? झाडाची गळली पानं ती, परत कधी जुळलीत का ? मग तडा गेलेल्या काचापरी विखुरलेलं नातं हे मग मी का असं सावरत असतो ? पुन्हा ते नातं तसच व्हावं हा प्रयत्न उगा का करत असतो ? एकदा गेलेले क्षण खरच पुन्हा नाही येतात का ? अनुभवलेलं सर्व काही विसरून असं जातात का ? पुन्हा ते तसचं तशीच तू पुन्हा तशीच माझी तू पुन्हा परत येशील का ? पुन्हा तोच निरुत्तरीत प्रश्न पुन्हा तू माझी होशील का ?
ती पावसाची सर कशी आली अंगावर लट निथळते कशी थेंब थेंब गालावर चिंब भिजूनीया आली अशी नजरे समोर जणू दिवसा पहावी रातराणीची बहर आता हटायची नाही तुझ्यावरची नजर गाली हसुनिया सखे केला भलता कहर रूप देखणे तुझे हे मन झाले अनावर तुझ्या प्रेमानेच आता सखे मला तू सावर
जिवनात येऊदे कितीही संकटे पण तु नेहमी हसत राहा. नाही मिळाले पंचपक्वान जरी खायला तुझ्यासोबत चटणी भाकरी ही गोड लागे मला हौस नाही मला सोन्या चांदिच्या दागिन्यांची तुझ्यासारखा हिरा आहे आयुष्यात माझ्या नाही राहिले बंगल्यामध्ये तरी चालेल मला हातात हात घेऊन तुझ्यासोबत चालायला कधीही आवडेल मला नाही झाली माझी स्वप्ने पूर्ण तरीही चालेल मला पण तुझ्या स्वप्नांना पंख फुटलेले पाहायला कधीही आवडेल मला तु आयुष्यभर रडवलेस तरीही चालेल मला पण तुझ्या डोळ्यांत पाण्याचा एक थेंब ही नाही पाहवणार मला महागडे हॉटेल्स , खरेदी याची हौसच आहे कोणाला तुझ्याकडे डोळे भरून पाहण्यात आभाळभर सुख आहे मला नाही ओळख दाखवलीस चार चौघात तरी चालेल मला तु फक्त माझाच आहेस हि भावनाच पुरेशी आहे मला नाही आयुष्य भर जवळ घेतले तरीही चालेल मला पण शेवटच्या क्षणी मरण्यासाठी तुझीच मिठी हवी आहे मला
माझ्या जवळ तू आहेस ना वेड्या मनाला माझ्या तुझ्याशिवाय काही सुचत नाही तू तू अन् फक्त तू दुसर काही दिसतच नाही सांग ना तू आहेस ना स्वप्नांचा साज घेऊन तू आलास नकळत मनाच्या कोपऱ्यात येऊन दडलास सांग ना तिथे तू आहेस ना येताच आठवण तुझी चाद्याला मी धरलाय सांग ना त्याच्या गंधात तू आहेस ना चाफ्याची उपमा तुला देऊन माझा श्वास त्यात गुंतलाय सांग ना तू माझ्या श्वासात आहेस ना माझ्या चेहऱ्यावरचे हसू गालावरच्या खळी मधे दिसते सांग ना खळी ला त्या माझ्या तुझा स्पर्श आहे ना माझ वेड्या सारख वागण्या मागे काहीतरी कारण आहे त्यात तुझ्यासाठी प्रेम दडलंय सांग ना तुला ते ठाऊक आहे ना सांग ना माझ्या जवळ तू आहेस ना. तू आहेस ना ......
हरवून गेली रात्र काळजात सखे नेहमी फक्त तुझाच वावर आहे आठवणीत झुरतो सदा का रात्रीस जागर आहे? हरवून गेली रात्र कुठे सापडेना सूर मनाचा संभाळून ठेवतो साठा सार्या भेटीच्या क्षणाचा जादू आहे कशाची ही बेभान जगणे हे झाले स्मरण तुझे झाल्यावर गहिवरून मन हे आले
कस सांगु मी तुला........ सांगु कस तुला मी साजणी मन माझे तुझ्यामध्ये गुंतले तुझ्या एका भेटीने मन माझे फुलले आयुष्याच्या इंद्रधनुष्याचे रंग बदलले गर्द रानाच्या काटेरी कुंपणातील फुल मज आवडले भिती भीतीने मन माझे हरवले प्रत्येक शण रंगवूनी मी फुलवू लागलो दुःखाचे ढग मन तुडवू लागलो आज भिती नाही कुणाची मनाला फक्त दिसते तिच माझ्या ऋद्याला
मी रोजच कविता करतो धगाळलेल्या मनाच्या भावना कागदावर रेखाटतो असुरलेल्या जीवाच मन मोकळं करतो आठवणींच्या वेगाला मंद प्रकाश पाडतो मी रोजच कविता करतो भेगाळलेल्या काळजाला वाचा फोडतो ओल्या पापण्यांत आसरा मी शोधतो मी रोजच कविता करतो
बोलण्यातच आयुष्य निघून जाईल जे करायचा ते राहून जाईल बोलून बोलून बोलून तोंडाला लाळ येईल नंतर जंतरमंतर करतोस मनून आळ येईल तुला पण ऐकून ऐकून कंटाळ येईल करणार्यांना करून करून कटाळ येईल आयुष्याचं स्वप्न रटाळ होईल अजून उजडत कसं नाही मनून नुसती सकाळ होईल
तू प्रेम केलंस म्हणून.... तू प्रेम केलंस म्हणून चिडणार तर कुणीच नाही तू प्रेम केलंस म्हणून रडणार तर कुणीच नाही फुलवीणारा बाग़ माळी फूलांसाठी किती खपतों प्रत्येक कळी फुलावी म्हणून पाकळी पाकळी किती जपतो जरुर त्या माळयाकडून मोकळ मोकळ रान घे नकोस आसू पाहू त्याचे विश्वासाचे दान दे जन्मणाऱ्या प्रत्येकाने आनंदाने जगत रहावे फुल होण्याआधी दु:ख कळीने का बघत रहावे म्हनून कळे फुलून घे अस्सल प्रेम तोलून घे बोलता बोलता भविष्यातील आयुष्यावर बोलून घे प्रेम म्हणजे विश्वासाचे खोल खोल नाते असते वारयावरती झुलते फूलते हिरवे हिरवे पाते असते प्रेम म्हणजे अल्लंड अल्लंड हुंदडणारे वासरू असते आभाळभर हसत खेळत भिरभिरणारे पाखरू असते तू प्रेम केलंस म्हणून वसंत कसा फुलला बघ फांदीवरुन कोकिळ पक्षी गाण्यामधून बोलला बघ तू प्रेम केलंस म्हणून वाऱ्यालाही गंध आहे पैंजनरव ऐकण्याचा पण पाणवठयाला छंद आहे म्हणून राणी फुलून घे अस्संल प्रेम तोलून घे आपलं माणूस ओळखून खुशाल झुल्यावरती झुलुन घे अस्सं प्रेम केलंस म्हणून बुडणार तर कुणीच नाही तू प्रेम केलंस म्हणून रडणार तर कुणीच नाही तू प्रेम केलंस म्हणून चिडणार तर कुणीच नाही ....
.png)